शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९

व्हॉट्स अॅप समुह.

*व्हॉट्स ॲप समुह*

    असावा एखादा
समुह व्हॉट्स ॲप'चा
ज्यायोगे जागतात
आठवणी बालपणीच्या....

रेंगाळत नव्याने
बालपणात
काढाव्यात खोड्या
परस्परांत...

चिडवा चिडवी
हसवा हसवी आणि
फिरक्या घेत
बनवा बनवी....

नसेल या समुहात
आकस आसुया
असतील वाहत सदा
आनंदी नद्या...

विसरुन साऱ्यांनी
वयाचे बंधन
दरवळत ठेवावे
मैत्रीचे चंदन....

होऊन प्रत्येकाच्या
सुख दुःखात वाटेकरी
नव्याने पेरत पेरत
मैत्रीची अदाकारी....

निर्मळ निर्भेळ मैत्रीत
मने होताना लुब्ध
अहंकार श्रीमंती
होऊन जावो लुप्त....

ओढ वाटावी कायम
मैत्रेय नात्याची
साधताना संवाद
आठवण बालपणीची...

मंत्रमुग्ध करणाऱ्या बाल आठवणींची .......
बाल आठवणींची.....

*नंदिनी म.देशपांडे*

nmdabad@gmail.com .

🌷🌷🌷🌷🌷🌷

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा