शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९

प्रजासत्ताक दिन.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

स्वातंत्र्य,समता बंधुत्व
   अन् धर्मनिरपेक्षता  

   आहेत आभुषंणं ही
आमच्या
    राज्य घटनेची....

    सजलाय मुकूट
    तत्त्वांचा हा भारत 
      मातेच्या भाळी.....

    राज्य घटना ही
आम्हा भारतीयांची
पाऊल वाट आमच्या
आयुष्याची....

अभिव्यक्ती,संचार,
शिक्षण स्वातंत्र्य
टिळा असे हाआमच्या भाळी

जपूनी प्राणपणाने यांना
वसा घेतला एकोप्याचा....

मानवतेचा धर्म आमचा
रक्षण करिती निती मुल्यांचे....

आहोत जरी आम्ही
विविध पंथांचे
जरी बोलतो नाना भाषाही...

मात्र रंग आमच्या रक्ताचा
तांबडा तांबडा
आणि तांबडाच केवळ....

हिंदू मुस्लीम सिख
ईसाई  फांद्या जणू
या एकाच वृक्षाच्या....

विचार धारा भिन्न परि या
पवित्र असती लोकांस....

आदर करुनी परस्परांचा 
माळ गुंफूनी एकत्त्वाची....

राखूनिया मान तिरंग्याचा
नतमस्तक आम्ही
भारतमातेच्या....

रंग केशरी पराक्रमाचा
शुभ्र पांढरा सद्भावनेचा
हिरवा रंग हा समृध्दीचा
शालू आमच्या मातृभूमी चा...

अशोक चक्र हे ब्रिद आमचे
झळके अविरत
उंच आकाशी
फडकवूनी तिरंगा
उंच आकाशी उंच आकाशी....

©*नंदिनी म. देशपांडे*

२६ जानेवारी,२०१९.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा