शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९

श्रावण.

*श्रावण महिमा*

आली आली पंचमी,
संगे घेवूनी श्रावण सरी।

मनी फुलोरा फुलला,
रान झुला सोबतीला।

भाऊ राया आला घरा,
करीन त्याला गं
मी पाहूणचारा।

मधूर पुरण पोळी खास,
तिला साजूक तुपाची आस।

पुजाया सयासंगे गौराईला,
पंच पक्वान्न मेजवानीला।

पुरण पोळी राणी ताटाची,
लोणकढी धार सई तिची।

संगे लाडू करंजी
अनारसा,
वसे त्यात माऊली
प्रेमाचा आरसा।

असे औक्षवंत भाऊ माझा,
बांधते राखी मी गं त्याला।

पुरण पोळीचा मान त्याचा,
बहिणीच्याही आवडीचा।

आला पोळा वाजत गाजत,
बैलांना हो ‌झूली सजवत।

बळी राजा आनंदला,
घाली पुरण पोळी
सर्ज्या राजाला।

अशी जोडी
श्रावण पुरण पोळीची,
साऱ्यांच्याच आवडीची।

©नंदिनी म.देशपांडे.

२१.७.२०१८.

🎄🎄🎄🎄🎄🎄

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा