सोमवार, २७ मे, २०१९

अनुबंध २.

*अनुबंध*

दुर्गा पांडे २६,मे रोजी,प्रभाकराशी जन्मगाठ बांधत उर्वरित आयुष्यभरासाठी दुर्गा उमरीकर बनली आणि लक्ष्मीच्या पावलांनी उमरीकरांच्या घरात प्रवेशती झाली....
   आज २६,मे आईच्या आयुष्यातील हे क्षण तिने आठवणीतून कायम जपून ठेवलेले कित्तेकदा आम्हाला सांगितले होते...या निमित्ताने प्रकर्षाने उफाळून आले आज....तिची सय करुन गेले.....
दुसऱ्या दिवशी औंढा नागनाथ येथे तिच्या वडिलांनी,नानांनी दिलेले गावजेवण सोहळा आटोपून सासरच्या घरी प्रवेश करताना वाजंत्री शिवाय माप ओलांडले होते तिने आपल्या घराच्या उंबऱ्याच्या आत ठेवलेले....
वाजंत्रीला फाटा दिला गेला कारण या दिवशी सकाळीच पंतप्रधान पं. नेहरु यांना देवाज्ञा झाल्याची बातमी आली होती....
    सोळा वर्षांची दहावीची परिक्षा दिलेली दुर्गा,या घरची सून म्हणून प्रवेशली अन् या कोवळ्या जीवावर एका गृहलक्ष्मीची मोठी अणि महत्वाची जबाबदारीही येऊन पडली....घरातील एकुलत्या एक लाडक्या मुलाची बायको,अर्थातच ती पण लाडकी बनत गेली....आपल्या कर्तव्याला जागून,टापटिपीचा संसार करुन,जबाबदारीने आपली सून,बायको,वहिनी
मामी इत्यादी भुमिकांच्या नात्यांमध्ये प्रेम,आपुलकी यांची पेरणी करत करत....
सासू सासऱ्यांच्या गळ्यातील ताईत केंव्हा बनलोय आपण ,हे समजलेही नाही तिला....
   नव्याने प्रवेश केलेल्या घरी रग्गड आमराई होती...
दर वर्षीच यथेच्छ पणे आमरसाचा आस्वाद सोबतच माहेरपण आणि उन्हाळी सुट्ट्या असं औचित्य साधत येणाऱ्या तिघीही नणंदा,त्यांची मुलं व तिनही जावई यांनी दोन तीन महिने घर कसं भरलेलं असायचं....या साऱ्याना भेटावयास म्हणून ईतर जवळीकीची नातेवाईक मंडळी यांचाही राबता असायचाच....पण नेमक्याच नवीन नवरी बनून आलेल्या दुर्गाला थोडं गोंधळून थोडं संकोचून जायला व्हायचं....पण तिच्या लावून रहाणाऱ्या स्वभावाने तिने प्रत्येकाच्या मनात आपली अशी एक जागा व्यापून ठेवली होती....कायमचीच...हे तिचं व्यापून रहाणं हा तिच्यातल्या चांगुलपणाचा,तिच्या सेवाभावी वृत्तीचा आणि तिच्या थोरांना आदरयुक्त वागणुकीचा पुरावाच होता असे म्हणता येईल....

© *नंदिनी*

💠💠💠💠💠💠

शनिवार, २५ मे, २०१९

दोन कविता....

*हिंदोळा*

आठवणींच्या हिंदोळ्यावर
स्वार होत जगावे...
आस्वाद घ्यावा आयुष्याचा
जपून साऱ्या क्षणांना....
सोनेरी हे क्षण
टॉणिक बनावे
जीवनाचे...
पेरत पेरत सर्वांमध्ये,
हिरवळ मैत्रीची फुलवावी....
फुललेल्या हिरवळीवर
मनसोक्त विहरावे....
हिरवळीवरच्या
गार दवाने
क्षुधा ही शमवावी...
हवंयं काय आणखी
या जगण्याला
समाधानाने तृप्त व्हावे....
समाधानाच्या तृप्तीचे चेहऱ्यावर प्रतिबिंब
पडावे,
परावर्तन या प्रतिबिंबाचे
साऱ्यांच्या
मुख कमलावर विलसावे....
आठवणींच्या हिंदोळ्यावर
स्वार होत विहरावे... आठवणींच्या हिंदोळ्यावर
स्वार होत बहरावे.....

© नंदिनी...

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

शुभेच्छा....

नवा गडी नवा राज
नविन आशा नविन दिशा
नवा उन्मेश नव उद्देश
नविन पालवी नवा बहर
नव चैतन्य नवी प्रेरणा
नविन प्रयत्न नवप्रकाश
नवा आनंद नव साफल्य
नवे प्रकल्प नवे संकल्प
नविन जडणघडण
नविन कार्यप्रणालीला
खूप मनापासून शुभेच्छा.....

© नंदिनी.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, २० मे, २०१९

खळी.

😊 *खळी*

खळी ही तुझ्या गालावरची
जणू तिट तुझ्या
सौंदर्याची
वाटे स्पर्शावे या
मृदूल खळीला
टेकवूनि अलगद
अधर पाकळ्या
स्पर्शताच अलवार
अधर
लज्जेने व्हावेस तू
चूर चूर.......
लावोनि टक
न्याहाळावे तुझे
मी मुखकमळ......
लटक्या रागाने तू
बघावेस मज
लुकलुकत.....
ओंजळीत लपवूनि
आपुले चंद्रमुख.....
ती आभा
पसरावी
माझ्या नेत्रात.....

©*नंदिनी*

🌹

कॉफी.

*कॉफी*

एक कप कॉफी,पण काय जादू घडवते म्हणून सांगू....मस्त निक्क्या दुधाची,थोडी कमी गोड पण स्ट्रॉंग कॉफी,हॉं,पण मस्त मोठ्या मगात काठोकाठ भरलेली किंबहूणा मस्त फेसाळलेली हवी बरं का...काय तल्लफ देऊन जाते म्हणून सांगू तुम्हाला....अहाहा!!बरं का,कॉफी प्यावी तर मगातच.....कपबशीत मजा नाही येत...‌.त्या वेळी लागलेली पोटाची भूक ही बऱ्यापैकी शमणारी असते अशी कॉफी....होय, आणि वेळ काळाचं भान न ठेवणारी बरं का ही कॉफी....अगदी आपला स्वतःचा आणि अर्थातच ती पिणाऱ्या चा मूड जपणारी.....रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी कॉफी पिणारेही पुष्कळच...
     अचानक खूप दिवसांनी भेट झालेल्या मित्र मैत्रिणीला आणखी बोलते करण्यासाठी कॉफी हाच पहिला पर्याय!कॉफी साठी तिला घरी घेऊन जाणे किंवा एखाद्या कॉफी हाऊस मध्ये..... यथेच्छ गप्पांचा सहवास नक्कीच घडतो....
   "मी कॉफी फार छान बनवते हं...."एक लाडिक दृष्टिक्षेप टाकत प्रियकराला आपल्या प्रितीरसात भिजवण्यासाठी आवाहन म्हणजे एक मस्त पर्वणीच.....त्याला घरी बोलवायचे आणि बोलते करत ऐकत,निरखत रहायचे....किती ताकद ना ही एक कप कॉफी ची.....
    "चला,कॉफी घेऊ या"....हे परवलीचे वाक्य....ओळखीच्यांना घरी सहज बोलता बोलता घेऊन जाण्याचं एक निमित्त.... अनौपचारिक तरीही प्रेस्टिजिअस...."चला, चहा घेऊ या"पेक्षा"चला,कॉफी घेऊ या"....जास्त सुसंस्कृत वाटावं असंच....
असं का वाटावं ते उमगत नाही पण तसंच वाटतं हे खरं....
आता कॉफी बनवण्यात काय एवढा सुगरणपणा असेल हे ज्याचे त्यालाच ठाऊक.....पण असो...एक कप कॉफी माणसांना परस्परांच्या जवळ आणण्यास.... त्यांच्यातील अंतर मिटवण्यात यशस्वी होते हे नक्की....
  एनी वे,मला पण कॉफी छान बनवता येते बरं का!आणि आवडतेही मनापासून....तुम्हाला?
मग होऊन जाऊ द्या एक फेसाळलेला गरमागरम कॉफीचा एक कप.....

*©नंदिनी म. देशपांडे.*

☕☕☕☕☕☕

बुधवार, १५ मे, २०१९

शुभेच्छा.

नावातच असणारं माधुर्य....
त्याला साधेपणाचा साज....
त्यावर निगर्वी पणाची
झालर....
प्रगल्भ विचारांची
महिरप....
श्रध्दाळू मनाचे कोंदण
आणि.....
मनस्वी निरागसतेला
शिस्तीचे वळण....
विश्वासाचे ल्यालेले गोंदण....
प्रखर बुद्धिमत्तेचा मुकुट.....
मनाचा हळूवार पणा....
त्याला प्रेमाची चौकट....
तर
टापटिपीची आवड....
हा सारा गोडवा आहे माझ्या....
सखयाच्या व्यक्तिमत्वात.....
कोण तो म्हणून विचारा
तर...
अहो तो तर माझा सांगाती....
आयुष्यभराचा जोडिदार....
माझा तो प्रियकर....
नाव त्याचे
*मधुकर*......
वाढदिवसा निमित्ताने
त्याला ....मनस्वी शुभेच्छा.... आभाळभर शुभेच्छा....हृदयस्थ शुभेच्छा....

*सौ. नंदिनी*

🌹👑🎼🎂🍦🍫

सोमवार, १३ मे, २०१९

सहजीवन

सहजीवन, परस्परांचा एकमेकांवरील अतूट विश्वास.....
सहजीवन,जोडीदाराशी
वैचारिक आदानप्रदान....
सहजीवन,सुख दुःखातील समान वाटा....
सहजीवन,परस्परांचा मान सन्मान जपणं....
सहजीवन,परस्परांना बहाल केलेला भावनिक
ओलावा....
सहजीव,जीवनाचा चढ उतार अनुभवताना दिलेला कणखर आधार....
सहजीवन, परस्परांच्या जडण घडणीत उभतांचा सिंहाचा वाटा....
सहजीवन, दोघंही एकमेकांची सावली बनून रहाणं.....
सहजीवन,सहचराच्याआयुष्यातील मुलायम हिरवळ....
सहजीवन श्वासाच्या अंता पर्यंत यथार्थ साथ...
सहजीवन,आयुष्यभर एकमेकांवर प्रेमाची बरसात....
सहजीवन,तू आणि मी यांचे
अविभाज्य अस्तित्व...
सहजीवन,आठवणींच्या गोड हिंदोळ्यावर
प्रितरसाचे सदैव सिंचन.....
सहजीवन,मूर्ति दोन पण
एकच श्वास...

© *नंदिनी*.

🌹🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, १० मे, २०१९

पावा

कृष्णसखा तू
शामल घननीळ
वाजवितो बासरी
सूर बासरीचे
गोड मधुर ते
वेड जीवा लावती
प्राणाचेही कान करुनी
मज होईना तृप्ती
चिंब चिंब भिजावे
सुरात तुझिया
सांगे हा पावा
आळव रे तू प्रेमगीत
सखया अधिर ही राधा
राधेचे बावरणे तुजला
साद घाली मनरमणा
सवे तुझ्या रमण्याने मीही 
रंगूनी जावे तुझ्या संगती
आस असे ही जन्मांतरीची
व्हावे एकरुप इतके की
न रहावे माझे मी पणही
तू अन मी एक रहावे
दिसे ना वेगळेपण
मुर्ति असे कान्हाची
परी प्राण हा राधेचा
सुरात तुझिया
विरघळले मी
कोण कान्हा अन्
कोण राधा
कान्हा राधा
अस्तित्व एकच
एक श्वास अन् ध्यास एक तो भक्तिप्रेमाचा
अलौकिक हे प्रेम मनांचे
साधती अव्दैता
साधती अव्दैता....

© *नंदिनी*

🎼🎼🎼🎼🎼

गुरुवार, २ मे, २०१९

मैत्रीचा वारा.

*मैत्रीचा वारा
सुगंधाच्या
झुळकीचा
शितल शामल
चांदण्याचा
मुलायम अश्वासक
शब्दांचा

मैत्रीचा वारा
निर्मळ निर्भेळ
भावनांचा
निर्व्याज निःस्वार्थ
प्रेमाचा
हृदयाच्या हाकेचा

मैत्रीचा वारा
दुःखावर फुंकर
मायेची ऊब
सौख्याची छाया
आयुष्यातील
हिरवळ........

*नंदिनी*

🎼🎼🎼🎼

*बहावा*

पिवळा धमक बहावा बहरला
सोन्याच्या लगडीच जणू
हिरव्या पानांना लटकल्या
पिवळे सोनेरी तुरे
मनोहर
डोलणारे झुमकेच हे
झाडाचे सुंदर
हिरवी हिरवी पानं
डोकावतात मधूनच
गोड हसतात ती
आपल्याकडं बघुनच
बहरलेल्या पानांना
सोनेरी साज
एवढ्या होरपळीतही
मी बहरलोय खास
यावे साऱ्यांनी
सावलीत माझ्या
क्षणभराचा विसावा
द्यावा आपल्या जीवाला....

*नंदिनी*
🍃🍃🍃🍃🍃🍃

*खळी*

खळी ही तुझ्या गालावरची
जणू तिट तुझ्या
सौंदर्याची
वाटे स्पर्शावे या
मृदूल खळीला
टेकवूनि अलगद
अधर पाकळ्या
स्पर्शताच अलवार
अधर
लज्जेने व्हावेस तू
चूर चूर.......
लावोनि टक
न्याहाळावे तुझे
मी मुखकमळ......
लटक्या रागाने तू
बघावेस मज
लुकलुकत.....
ओंजळीत लपवूनि
आपुले चंद्रमुख.....
ती आभा
पसरावी
माझ्या नेत्रात.....

*नंदिनी*

🌹