*रिकामं घरटं*
देवा असं कसं मन ?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले
आसं सपन पडलं!
मानवी मनाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवत असताना बहिणा बाईंनी या मनाच्या उद्गात्यालाच केलेला प्रति प्रश्न आपल्याला खरंच अंतर्मुख करून टाकतो.....आपल्या आठवणी कधी कधी अगदी ब्लॅन्क होऊन जातात....आपण त्यावेळी मी पार विसरले असे म्हणतो....पण आपले मन कधी ब्लॅंक होताना जाणवले का आपल्याला?आपल्या मानसिकतेचा आत्मा असणारं हे मन जर ब्लॅंक झालं तर.....आपल्या मनाचं आणि भाव विश्वाचं खूप जवळचं नातं आहे....मनाचं पाखरू भावनांच्या हिंदोळ्यावर नेहमीच उडान घेण्याच्या प्रयत्नात असतं....मन आणि रिकामपण यांच्यातही तसं काही साधर्म्य नाहीच ....आपण निवांत असतानाही हे मन पाखरू अवती भोवती मुक्तपणे सैर करून येतंच असतं.... किंबहुणा,आपल्या प्रत्येक गोष्टीशी,माणसांशी,आपल्या वस्तू आणि वास्तूशी,व्यवसायाशी अनेक अनेक बाबींशी आपलं हे मन बांधिलकी जपत असतं .....कधी कधी याची अशी अत्यंतिक सलगी आपल्याला खूप तापदायक ठरते.....
मी आणि माझे मन यांच्या व्दंव्दा मध्ये पुष्कळ वेळी माझे मनच वरचढ ठरते....खरं तर माझ्यातील मी ला काही क्षण का असेनात पण ते केवळ माझेच असावेत असे वाटते.त्यात मी आणि फक्त मी च असवी....अशा वेळी माझ्या मनाला सुध्दा लगाम घालून माझ्याच भोवती पिंगा घालावयास मी भाग पाडते ना, त्या वेळी माझ्या मनाचं घरटं,(मनातील इतर कोणतेही विचार बाजूला सारल्यामूळे)पुर्णतः रितं झालेलं असतं....माझा मनमोर हा माझ्या स्व च्या पुर्णपणे आधिन झालेला असतो या वेळी....ते स्व भोवती आनंदाने फुलोरा फुलवत थुईथुई नाचत असतं.....हेच मनाच्या आतील गाभार्याचं रुपांतरित झालेलं रिकामं घरटं असतं प्रत्येकाचं.....स्वानंदा साठी दिवसभराच्या रामरगाड्यातून आपल्या स्वतः साठी एखाद्या आवडीच्या कामात घालवलेले हे निवांत क्षण खरंच खूपच मोलाचे.....व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचे असे रिते घरटे वेगवेगळं निश्चितच असणार .....आढावा घेतल्यास काहींना ते आपल्या व्यायामा नंतर पाणी पिण्याची वेळ आपलं रिकामं घरटं वाटतं तर काहींना सकाळी सकाळी चहा घेत घराच्या खिडकीतून बाहेर निरिक्षण करताना....मला मात्र माझी दैनंदिन कामं आटोपल्या नंतर आत्ता लगेच करावे लागेल असे काहीच शिल्लक नाही आणि आता या वेळची मी एकटी राणी असे म्हणत हुश्श करते आणि माझ्या आवडीचे लिखाणाचे काम हाती घेते किंवा आवडती जुनी गाणी ऐकते तेच माझं रिकामं घरटं आहे हे मला त्या वेळी उमगते आणि खूप मना पासून त्या क्षणांचा आनंद मी माझ्यासाठी घेते......तुम्हीही सांगू शकता ,असं रिकामं घरटं तुमच्या साठी केंव्हा उपलब्ध होतं दिवसभरात ते!!!
*अॅड.नंदिनी देशपांडे.*©
nmdabad@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा