*धर्म*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आपला भारत देश,त्याच्या खास वैशिष्ट्यांची आभुषणं आपल्या शिरपेचात खोऊन मोठ्या अभिमानाने या जगाच्या नकाशावर डौलात उभा असल्याचे आपण बघतो आहोतच....नक्कीच प्रत्येक भारतीया साठी ही फार वंदनीय बाब आहे.....आपल्या मातृभूमीची ही विविध आभुषणं,अलंकार किंवा दागिने कोणते ? असा प्रश्न असेल तर मी उत्तर देईन....वैविध्य,सर्व धर्म समभाव, यांमध्ये दडलेली तिची संस्कृति.....वैविध्यते मध्ये विविध भाषा,प्रदेश,धर्म ,जाती,पोशाख,पदार्थ इत्यादी इत्यादी.....सर्व धर्म समभाव हे तर आपल्या राज्य घटनेचे एक ठळक सौंदर्यच ......
हेच सौंदर्य प्रत्येक भारतीयाने अतिशय काळजी पुर्वक हाताळले,जपले,त्याचा आदर केला तर त्या सारखे भुषणावह काहीही नसेल असे वाटते....
माणूस,हा फार समाजशील प्राणी आहे,तसा तो भावनाशील आणि सश्रध्द सुध्दा आहेच....माणूस,मग तो कोणत्याही जातीधर्माचा का असेना त्या प्रत्येकाला अशी भावनिक भूक असतेच असते....म्हणूनच भारतीय संस्कृती ही विविध धर्माच्या आधिष्ठानावर ,तत्वज्ञानावर उठून दिसते नेहमीच..... धर्म आपल्या तत्वांत कायमच इतर सर्व धर्मतत्वांचा आदर करण्याचीच शिकवण देत असतो यात दुमत नाहीच......प्रत्येक धर्म संस्कृति ही जीवन जगण्याची एक एक कला कशी आहे,असावी हे शिकवतो आणि त्या नुसार मार्ग दाखवतो असेच म्हणता येईल.....
एकमेकांच्या धर्मावर,ईश्वरावर कुरघोडी करणं हे कोणत्याही धर्माच्या तत्वांत बसणारे नाही....कारण असे केल्यास त्याला माणूसकीच्या धर्म तत्वात कधीच स्थान मिळणार नाही हेही तेवढेच खरे.... पण आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी आणि अस्तित्व टिकवून ठेवण्या साठी केवळ धार्मिक कामांना ,धार्मिक स्थळांना ,देवतांना भारंभार देणगी देणं अयोग्यच. या पेक्षा गरजवंताला ही रक्कम मदत म्हणून दिल्यास असे समाधान मनःशांती देवून जाते ....
खरे तर कोणत्याही धर्माच्या एकाही देवतेला पैशांची आसक्ती कधीच नव्हती ,नसणारही आहे पण त्या नावावर पैसा उभा करत स्वतःची तुंबडी भरण्याची मानवी वृत्ती फार घातक आहे. देवतेला देणगी बहाल केली,प्रत्यक्ष जाऊन हात जोडले म्हणजेच केवळ धर्म जपणे असे नव्हे. धर्म हा आपल्या मनात नितांत श्रध्दा ठेवत आपल्या वागण्या बोलण्यातून कृतितून ,वृत्तीतूनही जोपासला जाऊ शकतो....पण देणगीच्या स्वरुपात त्याचे प्रदर्शन मांडले जाऊ नये....देणगीचे स्वरुप आणि पध्दत यात गुप्तता पाळली गेली असेल तरच ती 'देणगी'या सदरात मोडेल नाही तर, ते देणार्याच्या श्रीमंतीचे प्रदर्शनच ठरेल....
सार्वजनिक स्वरुपाचे उत्सव सुध्दा मुठभर स्वार्थी लोकांच्या हातात सोपवून त्यांना त्यांच्या शक्ती प्रदर्शनाला वाव देत राजकारण करण्याची संधी उपलब्ध करुन देऊ नये. अशा पध्दतीने धर्माच्या नावाखाली चालणारे राजकारण चीड आणणारे ठरते....
देवतेला श्रध्देने जोडलेले दोन हात सुध्दा खूप होतात.....भावनेच्या आहारी न जाता सद्सद्विविवेक बुध्दी शाबुत ठेऊन जपलेला धर्म केंव्हाही श्रेष्ठच.मानवा जवळ भावने पेक्षा बुध्दीचे स्थान नेहमी उच्च प्रतिचे असतेच असते, याचे भान ठेवत वागणे फार आवश्यक आहे.....
प्रत्येक धर्माची सुटसुटीत व्याख्या म्हणजे "कर्तव्य''. धर्मग्रंथ परत्वे सांगितलेल्या तत्वांना अनुसरुन केलेले आचरण म्हणजे धर्म.ही सर्वच धर्माची तत्वे मानव कल्याणा साठीच लिहून ठेवली आहेत हे निश्चित. पण तथाकथित समाजाने आपल्या सोयीने अर्थ लावत त्यांना विकृत करुन ठेवले आहे....माणसाने आपल्या बुध्दिची दिशा त्यातील तत्वानुसार ठरवत वर्तन केले तर अजिबात गोंधळ उद्भवण्याचा प्रश्नच येणार नाही कधीही....
तात्पर्य काय ,तर प्रत्येक धर्म हा मानव कल्याणा साठीच विविध विचार धारांतून उदयाला आलेला आहे त्यां व्दारे कल्याणच साधले जावे, स्वार्थाला थारा असू नयेच कधीही तरच आपल्या भारतीय राज्य घटनेच्या तत्वांचे खर्या अर्थाने पालन होईल.....
नंदिनी म. देशपांडे .
nmdabad@gmail.com
आॅगस्ट ; १९,२०१७.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा