आज,निसर्गही मलूल झालाय... हिंगणघाट च्या"त्या"मुलीचा अतिशय दुःखद, क्लेशकारक अंत झालाय....काय चूक होती त्या मुलीची? केवळ तो "नालायक" मुलगा तिला आवडत नव्हता, तिनं नकार दिला म्हणून?मुळात आपण कोणत्या माणसा बरोबर आयुष्यभर रहावयाचं हे ठरवण्याचा तिचा मुलभूत अधिकार होताच....ती सज्ञान मुलगी सद्सद्विवेक बुध्दीने वागणारीच असावी....त्या मुलाच्या वागण्याच्या पध्दती वरुनच तिनंं आपला नकार दिलेला असावा...नकार देण्यासाठी याशिवाय इतरही भरपूर कारणं असू शकतातच ना....
पण म्हणून असा माथेफारु पण पणा....
आपण सर्वजणही याच समाजाचा एक भाग आहोत....केवळ ऐकायचे,टिव्हीवर बघायचे आणि सोडून द्यायचे का?अशा माणूसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडू नयेत म्हणून आपलीही काही जबाबदारी आहेच ना....
आपल्याच घरातूनच अशा प्रकारच्या जबाबदारीची जाणीव आपण आपल्या मुलांना करवून द्यावयास हवी...नैतिकतेचे धडे गिरवण्याची सुरुवात मूळी सर्वांत प्रथम घरातूनच केली जाते....
मुलांना मागेल ती गोष्ट अगदि आणूनच द्यावयासच हवी हा अट्टहास मुलाचाही नसावा आणि पालकांचाही....
मुलांना नकार पचवता यावयास हवा.कोणताही नकार सकारात्मकतेनं घ्यावययस हवा याचे संस्कार बाळकडू त्याला सर्व प्रथम घरातूनच मिळत असततात....
मुख्य म्हणजे त्याला आपल्या जवळ असणाऱ्या सद्सद्विवेक बुध्दीचा उपयोग कसा करावा? याचे पाठ घरातून सुरुवात करत द्यावयास हवेत
तर आणि तरच आपण थोडी का होईना समाज ऋणाची उतराई करण्याचा प्रयत्न केलाय असं मनाला वाटेल...
अशा पिडितांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे...केवळ मेणबत्त्या दिवे लावून मोर्चे काढून आणि कायदा हातात घेऊन काहीच होणार नाही...
तो नराधम तर फाशीच्याच शिक्षेच्या काबील आहे...त्याला ती कायद्याच्या चौकटीत नक्कीच मिळेल पण अशा प्रवृत्ती उद्भवूच नयेत यासाठी कुटुंब,समाज,शाळा कॉलेज पासूनच संस्कार फार महत्वाचे आहेत....ते पाल्यांवर करणं हे प्रत्येकाचचं कर्तव्य आहे...
त्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली...
नंदिनी.
😢
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा