*आण्णा काका अन् प्रभा काकू*
मंगल दिन आज
सोनियाचा आला ।
रंगला सोहळा
सहस्त्र चंद्रदर्शन अन्
अमृतमोहोत्सवाला ।।
तेजःपुंज दाम्पत्य
बैसले सिंहासिनी ।
उत्सव मूर्ती प्रभा काकूंसह
मूर्ती आण्णा काकांची भारदस्त साजिरी ।।
ही लक्ष्मी नारायणाची जोडी अविरत ।
असते करीत सतत प्रेमाची बरसात ।
स्नेह सावली आप्तांची
बनत.
साऱ्यांचीच ही स्नेह सावली।
आनंदे क्षण वेचती भरभरुनी
कौतुकाच्या वर्षावी सदा हासतमुख जोडी ही देखणी
स्पर्श ममतेचा पाठीवरी
मुलायम फिरे
उभयतां करवी
निरपेक्ष प्रेमाचा सागर अव्याहत
वाहतसे यांच्या रंध्री ।।
स्नेह सावलीने यांच्या
मिळे आधारवडाची थंड दाट छाया ।
तृप्त लोचने निरखिती
भुषण आप्तजनांचे करीती ।।
आनंद मुर्तींची जोडी
जणू खाणच
ही आशिर्वादांची ।
घालिती सडा अंगणी यशस्वीतेच्या मार्गावरुनी ।।
भरभरुन मुखी त्यांच्या
प्रेमळ आश्वस्त संवाद वसशी।
यथार्थ दिलासा सदा
आम्हा आप्त स्वकियास
देती ।।
चालतं बोलतं विद्यापीठ आण्णा काका आमचे असती ।
कुलगुरुचे पद भुषवी
प्रभा काकू विव्दान विदूषी।।
अभिमान यांचा असे आम्हा आप्तांना ।
लावी छंद जीवा
या पितृतुल्य जोडीच्या सहवासा रमण्या ।।
आशिर्वाद रुपी फुलांची
अशीच पखरण त्यांनी करावी ।
अन् उधळलेली फुलं
सारखी मनात आम्ही
मिरवती ठेवावी।।
उदंड आयुष्य
लाभो उभयता
ईश्वर चरणी प्रार्थना मनस्वी।
फुलं शतायुषाची वाहण्या
आस ही आहे सर्वस्वी।।
हृद्य सोहळा शतायुषाचा
पुनःश्च घडवूनी आणा देवा ।
ईच्छा ही आमच्या मनीची आपण पूर्ण करावी देवा पूर्ण करावी देवा।।
© *नंदिनी म. देशपांडे*.
🌹🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा