सनईने मांगल्य सूर आळवले
प्रकाशाने घरोघरचे दीप उजळले
रंगावलींनी अंगण सजवले
अभ्यंग स्नानाने चैतन्य पेरले
लाडू चकली शेव अनारसे
लज्जत वाढवण्या आले
आतिषबाजीने निशेचे सौंदर्य वाढवले
बहिणभावंड एकत्र जमले
प्रयोजन या मागचे काय ते?
अर्थातच, दिपावलीची लागली चाहूल
चला सारे मिळून आपण
स्वागता सामोरे दिपावलीच्या
स्नेहभेट घडवून आणू
परस्परां शुभेच्छा देवू
परस्परा शुभेच्छा देवू....
--- ॲड.नंदिनी-मधुकर.
नरकचतुर्दशी,२०२४.
💥💥💥💥💥💥💥🙏🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा