गुरुवार, २ मे, २०१९

मैत्रीचा वारा.

*मैत्रीचा वारा
सुगंधाच्या
झुळकीचा
शितल शामल
चांदण्याचा
मुलायम अश्वासक
शब्दांचा

मैत्रीचा वारा
निर्मळ निर्भेळ
भावनांचा
निर्व्याज निःस्वार्थ
प्रेमाचा
हृदयाच्या हाकेचा

मैत्रीचा वारा
दुःखावर फुंकर
मायेची ऊब
सौख्याची छाया
आयुष्यातील
हिरवळ........

*नंदिनी*

🎼🎼🎼🎼

*बहावा*

पिवळा धमक बहावा बहरला
सोन्याच्या लगडीच जणू
हिरव्या पानांना लटकल्या
पिवळे सोनेरी तुरे
मनोहर
डोलणारे झुमकेच हे
झाडाचे सुंदर
हिरवी हिरवी पानं
डोकावतात मधूनच
गोड हसतात ती
आपल्याकडं बघुनच
बहरलेल्या पानांना
सोनेरी साज
एवढ्या होरपळीतही
मी बहरलोय खास
यावे साऱ्यांनी
सावलीत माझ्या
क्षणभराचा विसावा
द्यावा आपल्या जीवाला....

*नंदिनी*
🍃🍃🍃🍃🍃🍃

*खळी*

खळी ही तुझ्या गालावरची
जणू तिट तुझ्या
सौंदर्याची
वाटे स्पर्शावे या
मृदूल खळीला
टेकवूनि अलगद
अधर पाकळ्या
स्पर्शताच अलवार
अधर
लज्जेने व्हावेस तू
चूर चूर.......
लावोनि टक
न्याहाळावे तुझे
मी मुखकमळ......
लटक्या रागाने तू
बघावेस मज
लुकलुकत.....
ओंजळीत लपवूनि
आपुले चंद्रमुख.....
ती आभा
पसरावी
माझ्या नेत्रात.....

*नंदिनी*

🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा