*कॉफी*
एक कप कॉफी,पण काय जादू घडवते म्हणून सांगू....मस्त निक्क्या दुधाची,थोडी कमी गोड पण स्ट्रॉंग कॉफी,हॉं,पण मस्त मोठ्या मगात काठोकाठ भरलेली किंबहूणा मस्त फेसाळलेली हवी बरं का...काय तल्लफ देऊन जाते म्हणून सांगू तुम्हाला....अहाहा!!बरं का,कॉफी प्यावी तर मगातच.....कपबशीत मजा नाही येत....त्या वेळी लागलेली पोटाची भूक ही बऱ्यापैकी शमणारी असते अशी कॉफी....होय, आणि वेळ काळाचं भान न ठेवणारी बरं का ही कॉफी....अगदी आपला स्वतःचा आणि अर्थातच ती पिणाऱ्या चा मूड जपणारी.....रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी कॉफी पिणारेही पुष्कळच...
अचानक खूप दिवसांनी भेट झालेल्या मित्र मैत्रिणीला आणखी बोलते करण्यासाठी कॉफी हाच पहिला पर्याय!कॉफी साठी तिला घरी घेऊन जाणे किंवा एखाद्या कॉफी हाऊस मध्ये..... यथेच्छ गप्पांचा सहवास नक्कीच घडतो....
"मी कॉफी फार छान बनवते हं...."एक लाडिक दृष्टिक्षेप टाकत प्रियकराला आपल्या प्रितीरसात भिजवण्यासाठी आवाहन म्हणजे एक मस्त पर्वणीच.....त्याला घरी बोलवायचे आणि बोलते करत ऐकत,निरखत रहायचे....किती ताकद ना ही एक कप कॉफी ची.....
"चला,कॉफी घेऊ या"....हे परवलीचे वाक्य....ओळखीच्यांना घरी सहज बोलता बोलता घेऊन जाण्याचं एक निमित्त.... अनौपचारिक तरीही प्रेस्टिजिअस...."चला, चहा घेऊ या"पेक्षा"चला,कॉफी घेऊ या"....जास्त सुसंस्कृत वाटावं असंच....
असं का वाटावं ते उमगत नाही पण तसंच वाटतं हे खरं....
आता कॉफी बनवण्यात काय एवढा सुगरणपणा असेल हे ज्याचे त्यालाच ठाऊक.....पण असो...एक कप कॉफी माणसांना परस्परांच्या जवळ आणण्यास.... त्यांच्यातील अंतर मिटवण्यात यशस्वी होते हे नक्की....
एनी वे,मला पण कॉफी छान बनवता येते बरं का!आणि आवडतेही मनापासून....तुम्हाला?
मग होऊन जाऊ द्या एक फेसाळलेला गरमागरम कॉफीचा एक कप.....
*©नंदिनी म. देशपांडे.*
☕☕☕☕☕☕
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा