सोमवार, २२ जानेवारी, २०२४

॥जय श्रीराम॥

हारफुलांचा साज ल्याला 
झोकात डोलल्या तोरणे पताका ।

रंगावलीने भुमी भारली 
दिपोत्सवाने रंगत आली ।

श्रीरामांचा ध्वज फडकला 
राम आगमनाचा सोहळा सजला ।

श्रीराम जयराम जयजयराम 
जल्लोष अवघ्या मातृभुमीचा जाहला ।

चराचरात गर्जे रामनामाचा गजर 
हर्ष दाटला मनोमन ।

आज विराजमान आमचे राघव 
आयोध्येत त्यांचे भव्यदिव्य स्वागत ।

याची देही याची डोळा 
सोहळा आम्ही श्रीराम आगमनाचा पाहिला ।

कणाकणास श्रीरामांचा ध्यास लागला 
त्यांंच्या चरणी अवघा भक्तीभाव 
लीन जाहला।

©️ॲड.नंदिनी म. देशपांडे.
जाने.२२,२०२४.
🌹🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा