मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

माझं मन.

‌ *माझं मन*

मन माझं कायम तेजाळलेलं,
सात्त्विकतेच्या प्रकाशानं
समाधानाच्या आकाश
कंदिलानं....

मन करतं मार्गक्रमण,
माणूसकीच्या पंथावरुन
तृप्ततेच्या वाटेवरुन....

मन माझं आसुसलेलं,
सद् विचारांच्या संगतीसाठी
मैत्रभाव जपण्यासाठी...

मन माझं ओथंबलेलं,
सत्कर्माच्या कौतुकासाठी
कोणाची तरी प्रेरणा बनण्यासाठी.....

मनाची माझ्या कायम
धडपड,
आनंदाचा पारिजातक
रुजवण्यासाठी
इतरांनी त्याची फुलं वेचावित यासाठी....

मन माझं कायम भुकेलं, प्रेमाच्या दोन शब्दांसाठी
नाती गोती जपण्यासाठी.....

मन माझं असतं भयभित,
व्देश,राग,आसुया कुरवाळण्यासाठी
नैतिकतेची सीमा रेषा
ओलांडण्यासाठी.....

मन माझं निर्ढावलेलं,
अन्यायाच्या प्रतिकारासाठी
सत्याची कास मुठीत गच्च ठेवण्यासाठी.....

मन माझं कायम हळवं,
दुःखीताचे अश्रु पुसण्यासाठी
मनाचे त्याच्या निरागसत्व
सांभाळण्यासाठी....

माझ्या मनाच्या या नाना कळा,
करतात प्रोत्साहित आयुष्याला......

एक सजग माणूस बनण्यासाठी,
चांगला माणूस या नात्यानं समाजात
वावरण्यासाठी.....

© *नंदिनी देशपांडे*

🌷🌷🌷🌷🌷🌷

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा