तब्बल तीन तपाच्या खंडा नंतर वर्षभरा पासून पुन्हा नव्याने नित्य संवाद साधावयास सुरुवात करत,मधल्या तीन तपांच्या काळाची भरपाई करण्याचा प्रयत्न सुरु केला होता आमचा मित्र कॅरी याने .
" काय गं नंदिनी,मी एवढा वेळ झाला आलोय पण तुम्ही मैत्रिणी मात्र बोलल्या नाहीत कश्या आणखीन?" एवढ्या बालिश प्रश्नातून मनाचाही तेवढाच निरागसपणा पाझरवणारा कॅरी,माझा शाळा मित्र . दहा बारा दिवसांपुर्विच भेटलो आम्ही परभणी मध्ये. अरेंज केलेल्या छोट्याशा गेट टूगेदर ला येणार नक्की असे सांगूनही त्याने रितसर फोनवर आमंत्रण दिलेच होते. माधुरीने ,(त्याची लाईफ पार्टनर) या वेळी सुरेख मराठी गाणं सादर केलं तेंव्हा,जाम खूष झाली होती,कॅरीची स्वारी. तो मनापासून चांगल्या संगीताचा भोक्ता आहे हे त्या वेळी त्याच्या चेहर्यावर दिसत होते. त्याची ही आवड ,तो व्हॉट्स अॅप वर सुंदर सुंदर मराठी हिंदी गाणी पाठवत शेअर करायचा याची आठवण झाली मला.तरीच,त्याचे व्हॉट्स अॅप स्टेटस् हे नेहमीच एखाद्या छानश्या मराठी भावगीताची आेळ का असायची याचाही उलगडा झाला या वेळी एकदम.
एकदा पुण्यातही आम्ही काही मित्रमंडळी आवर्जून ठरवून भेटलो होतो.स्वभाविकपणे इतरही सार्यांच्या आठवणी निघाल्या.त्या वेळी उमेश ने कॅरी विषयी सांगितले,"अरे यार,शाळेत असताना माझे गणित या विषयी कधी फारसे जमलेच नाही , पण आता मात्र मी स्वतः हाच विषय शिकवतो शाळेत ! असे कसे रे ?"असे बोलला होता त्याच्या जवळ.असा निरागस प्रश्न नितळ मनाचा प्रामाणिक माणूसच विचारु शकतो स्वतः विषयी हे मात्र खरे.
कांहीच महिन्यांपुर्वि प्रमोशन देत संस्थेने त्याला हेड मास्तर या पदाच्या खुर्चिवर बसवले होते सन्मानाने.कोण आनंद झाला होता त्याला या वेळी ! आपल्या परिवारासोबत ज्या हर्षोल्हासाने शेअर केली त्याने ही बातमी तेवढ्याच उत्साहाने ग्रुपवर आमच्या सर्व मित्र मैत्रिणींच्या मेळाव्यातही शेअर केली . फोटोंवरून त्याचा हा आनंद स्वच्छपणे चेहर्यावर प्रकटला होता . स्वतंत्र केबिन मध्ये विराजमान झालेला हा चेहरा समाधानाची अपुर्वाई अनुभवत उजळून निघालेला दिसला आम्हाला .
आमच्या एका शाळा मैत्रिणीचा वाढदिवस ग्रुपवर साजरा केला आम्ही ,त्यानेही शुभेच्छा दिल्या पण काही केल्या कॅरीला ती काही आठवतच नव्हती . तेंव्हा मुद्दाम फोन करत ,तिला आठवण्याचा त्याचा प्रयत्न माझ्या स्मरणात आहे आजही .
कॅरी नि माधुरी यांना त्यांच्या घरी जेंव्हा मी भेट दिली , त्यावेळी त्याची वहिनी ही माझी बहिण लागते हे बोलण्याच्या ओघात त्याला समजले आणि त्याच क्षणी प्रसन्नतेने फोन लावत आमच्यातील मैत्रीचे स्पष्टीकरण देत आनंद व्यक्त करत ,मलाही तिच्याशी संवाद साधावयास लावला तेंव्हाचा संवाद आजही जसाच्या तसा आठवतोय .
गेली बावीस तेवीस वर्षे नोकरी वर जाण्यासाठी पहाटे चारलाच उठावे लागते , 'साखर झोप' काय असते याचा पुर्णपणे विसर पडलाय आता . ही खंत विनोदी शैलीत मांडत तो कांही तरी मीस करतोय याची वेदना जाणवली कॅरीच्या मनात आणि संवेदनशील कॅरी डोकावून गेला त्या वेळी .
स्वतःच्या स्वकतृत्वावर बांधलेले टुमदार घर,मनमिळावू बोलकी बायको,आणि इंजिनिअर बनत असणार्या दोन गुणी मुली हीच माझी संपत्ती ,असे अभिमानाने सांगणारा निगर्वी , पण कुटुंब वत्सल कॅरी नेहमीच दिसायचा त्याच्या बोलण्यातून . आताशी आपल्या उपवर मुलीच्या विवाहाचे विचार मनात घोळवत असणारा जबाबदार कॅरी वारंवार दिसायचा .
जे आहे आपल्या जवळ त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर आनंदी आणि समाधानी असणे व 'अंथरुण पाहून पाय पसरणे' या तत्वावर विश्वास ठेवणारा विश्वासू कॅरी कायम खर्या हसर्या चेहर्याने वावरत दुसर्यांनाही आनंद वाटत फिरायचा.त्याच्यातील निःस्वार्थी भावना,मनाचा निरागसपणा, नितळ मनाचा स्वच्छ तळ ,त्याचे हास्य हे सर्व त्याच्या चेहर्याला उजळवत तेजस्वी ठेवत असत.त्याच्या मुळच्या काळ्या रंगावर लिलया मात करण्याचे काम चोख बनवत असत.पण तरीही आपल्या गमतीशीर बोलण्यातून तो आपल्याच रंगावर स्वतःच विनोद करायचा आणि सार्यांनाच हसवायचा.
असा हा आम्हा सर्वांचा मित्र कॅरी ,किरण गुळवेलकर याने आपल्या नावाचे शॉर्ट फॉर्म "कॅरी असे केलेले "आम्हा सर्वांना आवडलेच होते.नावातच गुळाचा गोडवा असणारा हा मित्र नेहमीच हा गोडवा आपल्या बोलण्यातून वाटत वाटत सर्वांना आपलंस करण्याचा छंद जोपासत असायचा .त्याच्याशी संवाद झाला की,आपल्या मनावरचा ताण कमी झालाय हे लक्षात यायचं लगेच.
" कधीच आजारपण असं माहित नाही " म्हणणारा कॅरी,आपल्या एका मित्राला,घरी गेल्यानंतर आता मात्र मी माझ्या आरोग्याकडे खूप लक्ष देणार असे प्रॉमिस देता झाला होता हॉस्पिट्ल मध्ये.चारच दिवस काय तो आजारी पडला होता,पण तरीही त्याच्या मनाचे कोमेजलेपण त्याने एकदाही दाखवले नाही .शारिरिक वेदनांमूळे आतल्या आत कोमेजत नियतीच्या , काळ आणि वेळ यांच्या कचाट्यात आमच्या सार्यांच्या आणि त्याच्याही नकळत सापडत गेला कॅरी.आपल्या मित्राला दिलेल्या वचनाला तो विसरला पण अगदी शेवट पर्यंत हसतमुखाने प्रतिसाद देणारा हा आमचा मित्र बाय करत सार्यांना कायमचा निरोप देता झाला. प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेला.
" जो आवडतो सर्वांना ,
तोचि आवडे देवाला "
ह्या उक्तिला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी......
आठवांच्या रुपात कॅरीला वाहिलेली ही छोटीशी शब्द सुमनांची भावांजली.........

नंदिनी म.देशपांडे .
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
Wonderful article
उत्तर द्याहटवाFantastic
उत्तर द्याहटवा