सुसंस्कारांची रुजवणूक करत , आम्हा भावंडांचे जिनं संगोपन केलं....
शिक्षणाशिवाय पुर्णत्व नाही असा ध्यास जिनं ठेवला...
अंथरुण बघून पसरावेत पाय ही शिकवण जिनं दिली...
यशोशिखरावर असतानाही पाऊलाने मात्र मातीशी ईमान ठेवावे असे आवर्जुन जिनं मनावर ठसवलं....
समाधानाचा लगाम आपल्याच हाती ठेवावा हे सुचित जिनं केलं... संकटसमयी धिर एकवटून सिध्द होत त्याच्याशी दोन हात करत यशस्वी सामना करावा असं जिनंसांगितलं. ...
माणूसकीची ज्योत कायम मनात तेवत ठेवावी...... अन्
सुख दुःखात सारखीच साथ देत सोबत सार्यांची करावी असे बाळकडू जिनं पाजवलं....
नात्यांमधील गोडवा अविरत जपावा हे जिनं शिकवलं....
मैत्रीला कायम आपलंसं करावं हे जिनं अनुभवातून दाखवलं....
आयुष्याची दिशा ठरवण्यात मोलाचे सहकार्य जिनं आम्हाला केलं....
अशा माझ्या प्रेमळ, निगर्वी सोज्वळ माऊलीचा, स्वर्गीय
सौ. दुर्गा प्रभाकर उमरीकर हिचा आज सातवा स्मृतिदिन....
तिच्या प्रतिमेला नमन करते आणि
तिला,तिच्या पवित्र स्मृतिंना, विनम्र विनम्र अभिवादन घालते...
मार्च, 11,2022.
नंदिनी...
🙏🌹🙏🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा