*चंद्रमा*🌕
हे शांत शितल चंद्रमा
निशेच्या आकाशीच्या
राजसा ।
बांधतअसतोस
प्रत्येकाच्या मनाशी
तू धागा ।
कळतं रे कसं
तुला मनातलं
निरव शांततेत साधत
असतोस गप्पाष्टकं ।
प्रेमिकांच्या प्रेमाचा
होतोस तू साक्षी
बहिणीला भावाच्या
हक्कानं तूच रक्षी।
वाढत असता
कलेकलेनं
अहंकार तू
त्यागून टाकतोस ।
कलेकलेनंच
कमी होताना सदैव
हसतमुख असतोस ।
नभांगणीच्या तारकांशी
मैत्र मात्र जोडतोस
आकाश गंगेचा प्रियतम
बनून सदा राहतोस।
आभा तुझी देखणी
तेजश्री त्यातूनि प्रकटी
प्रियकराच्या प्रियेचा
तू असशी ऋणी ।
मुखकमलाला तिच्या
तुझीच रे उपमा
सौंदर्याच्या साजाने
तूच चिरंतन साजिरा
तूच चिरंतन साजिरा ।
©
*नंदिनी म.देशपांडे*
दि.२१,जूलै,२०१९
औरंगाबाद.
🌕🌕🌕🌕🌕🌕